Dehu news: 50 भाविकांच्या उपस्थितीत आज श्री संत तुकाराम महाराज बीजसोहळा
Pckhabar- कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता यंदा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा आज (मंळवार) अवघ्या 50 निवडक भाविकांमध्ये संपन्न होणार आहे.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून लाखो भाविकांचे तीर्थक्षेत्र देहूत आगमन होत असते. पिंपरी-चिंचवड, पुणे यासह अन्य भागात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा भाविकांच्या मोठ्या संख्येत होणारा सोहळा रद्द करून निवडक भाविकांमध्ये संपन्न होणार आहे.
कोेरोनाचा वाढता प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी तसेच वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी तसेच भाविकांमध्ये प्रसार होऊ नये यासाठी सुरक्षितता आणि उपाययोजना करण्यासाठी बीज सोहळा निवडक 50 भाविकांमध्ये साजरा करण्यात येणार आहे.
दरम्यान, देहूत येणार्या सर्व रस्त्यांवर रविवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते गुरुवारी (दि. 31) मध्यरात्रीपर्यंत नाकाबंदी तसेच जमावबंदी करण्यात आली आहे. देहूगाव परिसरात ठिक-ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे देहूगावत सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तसेच राज्याच्या कानाकोपर्यातून येणारे भाविक, दिंड्या, फडकरी, वीणेकरी आदींनी तीर्थक्षेत्र देहू येथे येऊ नये, असे आवाहनही करण्यात आले.










Leave a Reply