Article By Dr. Ankush jadhav : प्रचंड गर्दी सोडून कोरोनाला महाराष्ट्राच प्रिय?

Article By Dr. Ankush jadhav : प्रचंड गर्दी सोडून कोरोनाला महाराष्ट्राच प्रिय?
Pckhabar-२०१९ च्या डिसेंबर मध्ये चीनच्या वूहान प्रांतात कोरोना चा पहिला रुग्ण आढळून आला व कोरोना विषाणू संसर्ग सर्व जगभर पसरला.२०२० मध्ये कोरोनामुळे जगाला लॉक डाऊन माहीत झाला.जगातील प्रत्येक गोष्टीवर कोरोनाने परिणाम केला की,तो कित्येक वर्षे विसरता येणार नाही.कोरोनाची पहिली लाट २०२० मध्ये पहिली.आता कोरोना गेला या समाधानात असतानाच २०२१ मध्ये पुन्हा कोरोनारुपी कर्दनकाळाची दुसरी लाट आली असून या लाटेने जगभरासहित भारतात ही पुन्हा हाहाकार माजविला आहे.२० प्रमाणे २१ हे वर्ष असेच जाणार का? याची चिंता सर्वांनाच लागून राहिली आहे.पुनः भयभीत व संशयाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. परंतु हे संशयाचे वातावरण महाराष्ट्रात जास्त आहे,याला कारण आहे महाराष्ट्रात दिसून येत असलेली कोरोना बधितांची संख्या.दि.२४ मार्च रोजी कोरोनाबाधितांची जी आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यात भारतात ४७,२६२ रुग्ण आढळून त्यातील ३१,८५५ इतके रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील असून या दिवशी देशात सक्रिय रुग्ण असलेल्या टॉप टेन मधील ९ शहरे ही महाराष्ट्रातील आहेत.फक्त १ शहर बंगरुळू हे कर्नाटकच्या राजधानीचे शहर आहे.तर २७ मार्च रोजी भारतात ६२ हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले.हा या वर्षातील एका दिवसातील रुग्णसंख्येचा उच्चांक आहे.तर याच दिवशी महाराष्ट्रात ३५ हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले.यापूर्वी ११ सप्टेंबर २० रोजी २४,८८९रुग्ण आढळून आले होते.आताचे प्रमाण हे याच्या दीडपट अधिक आहे.
2011 च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या १२१ कोटी पेक्षा अधिक होती.(आता साधारण १३५ कोटी पेक्षा अधिक आहे.)प्रति वर्ग कि. मी. मध्ये३८२ लोक राहतात. उ.प्र.ची लोकसंख्या त्यावेळी २०कोटी होती तर प्रति वर्ग कि. मी.८२८ लोक राहात होते.बिहार ची त्यावेळची लोकसंख्या १०कोटी पेक्षा अधिक होती तर प्रति वर्ग कि. मी.मध्ये १,१०२ लोक राहात होते.गुजरात ची लोकसंख्या त्यावेळी २.५०कोटी पेक्षा अधिक होती तर प्रति वर्ग कि. मी.३०८ लोक राहात होते.महाराष्ट्राची लोकसंख्या त्यावेळी११ कोटी पेक्षा अधिक होती तर प्रति वर्ग कि. मी.मध्ये३६५ लोक राहात होते.(आता सर्वच राज्यांची लोकसंख्या व प्रति वर्ग कि. मी.मध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे.)
कोरोना हा मुळत:प्राणी जगतातून मानावाकडे आलेला विषाणू.सामान्यतः बेसुमार जंगलतोड,वाढत चाललेले शहरीकरण, खाल्ला जाणार सर्वप्रकारचा मांसाहार,दुषित हवा-वातावरण,गर्दी इ.कारणामुळे कोरोना व कोरोना सारख्या सूक्ष्म, सूक्ष्मातिसूक्ष्म अनेक जीव,
विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात. एक सामान्य सिद्धांत आहेत आहे ,कोणत्याही प्रदूषित हवेत जीव, विषाणू यांची वाढ होते.आता जी जगातील सर्वाधिक शहरांची यादी प्रकाशित झाली आहे.त्यात भारतातील १५ शहरांचा समावेश आहे.त्यातील ११शहरे उ.प्र.तील आहेत तर त्यात महाराष्ट्रात तील भिवंडी या शहराचा समावेश आहे. या राज्यात,शहरात कोरोना रुग्ण नगण्य आहेत किंबहुना नाहीत. मग असा अर्थ काढावा का की, कोरोना विषाणू प्रदूषित हवेला घाबरतो,तो दूर पळून जातो?आणि तो तुलनात्मक दृष्टया स्वच्छ हवा असलेल्या महाराष्ट्रा च्या मागे लागतो. कमाल आहे?
२७ मार्च ला आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी ७०टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, पंजाब व केरळ मधील आहेत.२७ मार्च ला सर्वाधिक कोरोना बाधित जे ४६ जिल्हे आढळून आले,त्यातील २५ जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत.
वरील राज्ये, त्यांची लोकसंख्या, प्रति वर्ग कि. मी.लोकसंख्ये ची घनता याचा जरी विचार केला तरी उ.प्र. बिहार,गुजरात या राज्यात नगण्य रुग्ण आहाळून येतात.असे का?जेथे प्रति वर्ग कि. मी.
लोकसंख्येचे घनत्व महाराष्ट्रापेक्षा अधिक असून ही? महाराष्ट्र, केरळ व दिल्ली मध्ये च कोरोना बाधित अधिक का आढळून येतात? कोरोना ला येथील लोक आवडतात का?की,येथे प्रामाणिक पणे चाचण्या केल्या जातात.हा दोष आहे का?
एकवेळ मान्य करू की,याला महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील लोकसंख्येचे प्रमाण,स्थलांतरीत जे दररोज लाखो च्या संख्येच्या येत आहेत व ते बाधित असतील तर त्यांची नोंद ही व उपचार खर्च ही महाराष्ट्राच्या बोकांडी. अशीच गर्दी काही प्रमाणात अन्य राज्यात नाही का? तेथे कोरोना बधितांची संख्या कमी वा नाममात्र का आढळून येते? मध्यंतरी बिहार मध्ये विधान सभेच्या निवडणुका झाल्या. काही महिन्यांपूर्वी म.प्र त २८ जागे साठी पोटनिवडणूका झाल्या.तेव्हा कोरोना कुठे नाहीसा झाला होता?आता पश्चिम बंगाल,तामिळनाडू,केरळ
या राज्यात निवडणूका सुरू आहेत. पश्चिम बंगाल मध्ये नाममात्र कोरोना आहे. ज्या ज्या राज्यात निवडणुका होतात.तेथे नाममात्र कोरोना असतो.कारण हेच असावे की,कोरोना निवडणुकांना घाबरत असावा. त्याला भीती वाटत असावी आपण गर्दीत चिरडून मरू. निवडणुकीच्या प्रचंड गर्दीचे, चेंगराचेंगरी चे फोटो प्रकाशित होतात त्यात कुठे मास्क चा, सामान्य अंतराचा पत्ताच नसतो?का या गर्दीला पाहून कोरोना घाबरून गायब होतो? म्हणूनच तेथे कदाचित कोरोनाचे प्रमाण वाढत नसावे? बिहार मध्ये कोरोना चाचणीकर्त्या नागरिकांचा मोबाईल क्रमांक सर्रास ०००००००००० असा नोंदल्याचे आढळून आले आहे.त्या बिहारचीही स्थिती नियंत्रणात आहे. काही राज्यात चाचण्यांचे अहवाल २/३सकारात्मक दाखवून बाकी नकारात्मक दाखविले जातात. गुजरात मधील अहमदाबाद शहरातील”नरेंद्र मोदी स्टेडियम” मध्ये इंग्लंड विरुद्धचे टी-२०चे दोन प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीत पार पडले.उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री श्री.आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत लखनौ जवळ ३५०० हजार पेक्षा अधिक जोडप्यांचा आतापर्यंत चा सर्वात मोठा विक्रमी सामुदायिक विवाह सोहळा नुकताच पार पडला. त्याला किती गर्दी झाली असेल त्याचा तुम्हीच विचार करा?यावेळी कोरोना विषाणू पळून गेला होता का ? लपून बसला होता?आणि महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी विवाहा साठी ५० लोकांची अट पाळून ही कोरोना इथल्याच लोकांच्या मागे लागताना दिसत आहे.यावेळी कोरोना विषाणू पळून गेला होता का?महाराष्ट्रातील विदर्भ, नागपूर मध्ये उच्चांकी रुग्ण आढळत आहेत.तर याच्या बाजूलाच असलेल्या म.प्र.,ओडिशा
छत्तीसगड या राज्यात नगण्य रुग्ण आढळत आहेत.
गुजरात,कर्नाटकात ही महाराष्ट्रा च्या मानाने फारशी वाढ नाही? छत्तीसगड राज्याची राजधानी असलेल्या रायपूर मध्ये “लिजंड्स” क्रिकेट संघाचे सामने प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या स्टेडियम मध्ये होत आहेत.या वेळी कोरोना कुठे जातो? आता उत्तराखंड मध्ये १ एप्रिलपासून ते२८एप्रिल २१ पर्यंत हरिद्वारला “महाकुंभ “मेळा भरत आहे. कुंभमेळ्याला किती गर्दी होते, हे सर्वांनाच माहीत आहे.कदाचित या वेळी कोरोना सुट्टी वर जाईल?
उत्तरेतील राज्यातील होळी ची जी दृश्ये आज टी. वी. वर दिसली ती गर्दीच होळी साजरी होत असल्याचे दिसून आले.नियम कुठे नाहीतच?
आरोग्य सेवेत महाराष्ट्र अग्रेसर आहे.हे उत्तरे कडील राज्यांत ज्यांनी प्रवास केला आहेत. त्यांना निश्चित मान्य होईल.आरोग्य सेवेचा वानवा असलेल्या उ.प्र.,म.प्र.,बिहार इ. राज्यातून येणारी कोरोना बाधितांची आकडेवारी निश्चित च योग्य नाही.महाराष्ट्र ,केरळ,दिल्ली सोडून अन्य राज्यांतील आकडेवारीत काही तरी गडबड केली जात आहे. सर्व आकडे “मॅनेज ” केले जात असावेत.
अशी रास्त शंका येते.महाराष्ट्र, केरळ, दिल्ली या राज्यांतील आरोग्य सेवा वा यंत्रणा कार्यक्षम आहेत. म्हणूनच या राज्यात अधिक रुग्ण प्रामाणिक पणे नोंदले गेले आहेत व जातात.
प्रामाणिक पणे काम करणाऱ्या महाराष्ट्र, दिल्ली,
केरळ,पंजाब राज्यानाच केंद्रीय आरोग्य पथके इशाऱ्याचे,
उपदेशाचे डोस देतात तर प.बं.,आसाम येथील गर्दीकडे मात्र पद्धतशीर पणे दुर्लक्ष करतात.कारण तेथील निवडणुका, या केंद्रातील सत्तारूढ पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.मम्हणावेसे वाटते” हिरण्यकश्यप जैसा हो गया है वायरस—-मरू तो राजनीती से। जहाँ चुनाव है वहा अपने आप मर जाता है।”
आरोग्याच्या बाबतीत ही असा दुजाभाव करणे कितपत योग्य आहे.?
महाराष्ट्र प्रामाणिक पणे कोरोना संबंधित काम करून प्रामाणिक पणे आकडेवारी जाहीर करणे ही महाराष्ट्राची चूक तर नाही ना? जी जी राज्ये केंद्राला अनुकूल तेथील कोरोना बाधितांची संख्य नगण्य.हे कसे? अन्य राज्यातील आकडे पाहिल्यानंतर त्वरित लक्षात येते. महाराष्ट्र, केरळ,दिल्ली येथे सामान्यतः सर्व प्रतिबंधक उपायांचे पालन केले जात असून ही स्थिती?
निवडणूका,क्रिकेट,सामूहिक विवाह इ.अनेक कारणांनी दुसऱ्या राज्यात ही गर्दी होत आहे , कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही तरी तेथे कोरोना संसर्ग का पसरत नाही?हे एक न सुटणारे कोडे च आहे?सध्या बरेच लोक चक्क म्हणू लागलेत महाराष्ट्रात सत्तांतर झाले तर येथील ही कोरोना त्वरित आटोक्यात येईल?
असो सध्या तरी सामान्य नियम पाळून कोरोना पासून आपले रक्षण करा.योग्य प्रकारे मास्क लावा,वारंवार हात धुवा, दोघांमध्ये योग्य अंतर राखा व गर्दी पासून दूर राहा.आपण लस घेतली असेल तरी या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
डॉ. अंकुश जाधव
नवी मुंबई, इस्लामपूर(सांगली).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *