Chinchwad news: भाजप नगरसेविकेच्या मुलाची गोळी झाडून आत्महत्या

Chinchwad news: भाजप नगरसेविकेच्या मुलाची गोळी झाडून आत्महत्या
Pckhabar- भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या मुलाने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी  रात्री चिंचवड गावात घडली.

प्रसन्न  शेखर चिंचवडे असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसन्न याने त्याच्या वडिलांच्या पिस्तूलातून स्वतःवर गोळी झाडून घेतली. प्रसन्ना याला तात्काळ उपचारासाठी थेरगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज सकाळी पहाटे काळेवाडी येथील समशान भूमी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोळी झाडून घेण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *