Cricket news: दुर्बिणीद्वारे निरीक्षण करून भारत-इंग्लड मॅचवर सट्टा, ही आहेत 33 आरोपींची नावे  

Cricket news: दुर्बिणीद्वारे निरीक्षण करून भारत-इंग्लड मॅचवर सट्टा, ही आहेत 33 आरोपींची नावे
Pckhabar- गहूंजे येथे सुरू असलेल्या दुसर्‍या भारत- इंग्लंड एकदिवसीय सामन्यावर दुर्बिणीद्वारे निरीक्षण करून सट्टा लावणार्‍या विविध राज्यांतील 33 जणांना तीन ठिकाणांहून पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याजवळून तब्बल 44 लाख 87 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.
वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी याबाबत माहिती दिली.
सट्टेबाजांची नावे पुढीलप्रमाणे ः कार्तिक चावला (वय 28, रा. नवी दिल्ली), गोविंद मणिहार (वय 31, रा. नागपूर), गौरव वाधवा (वय 30) सागर नारंग (वय 20), प्रेमजित रमेशचंद्र (वय20), रामविरसिंग बेनिवाल (वय 32), अमितकुमार राजपुत (वय 27), राहुल राजपुत (वय 27), राजेंदर वधवा (वय 39), हिमांशु हासिझा (वय 28), कमलेश चावला (वय 35),  रिक्की बिरमणी (वय 34), जतीन सेठी (वय 29), सचिन बत्रा (वय 32), लवीश चावला (वय 29, सर्व रा. हरियाणा), रेमंड कयादो (वय 21, रा. गोवा), अमित चौधरी (वय 25), विशालसिंग भदोरिया (वय 24),  सतेंद्रसिंग गुज्जर (वय 27, सर्व रा. मध्यप्रदेश), गजानन यादव (वय 34, रा. मांजरी), मुनिष सैनी (वय 31), मनिष लाहोटी (वय 40, रा. राजस्थान), शादाब खान (वय 27, रा. उत्तरप्रदेश), भरतकुमार सुहालगा (वय 40, रा. राजस्थान), दिलीप जैन (वय 34), उजास पटेल (वय 38), नीलेश सर्वय्या (वय 32, सर्व रा. मालाड, मुंबई), विजय हेमनानी (वय 35, रा. नागपूर), वॅैनेडी करमचंदानी (वय 35, रा. नागपूर), अनिल सोनी (वय 32, रा. मध्यप्रदेश), अनिकेत कोठारे (वय 28, रा. नागपूर), पंकज महेर (वय 25, रा. वडगाव शेरी), अविनाश वडमारे (वय 36, रा. वडगाव शेरी).
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) गहुंजे येथील मैदानावर भारत-इंग्लंड संघामध्ये शुक्रवारी दुसरा एकदिवसीय सामना होता. या सामन्याचे दुरून दुर्बिणीद्वारे निरीक्षण करून सामन्याची बॉल टू बॉल माहिती देत काही जण ऑनलाईन सट्टा खेळत असल्याची माहिती वाकड पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीसांनी मामुर्डी येथील गोदरेज ग्रीनपार्क या नावाने सुरू असलेल्या ट्रायकॉन इन्प्रैा बिल्डटेक कंपनी, घोरावडेश्वर डोंगर आणि विमाननगर येथील हॉटेल लेमन ट्री या तीन ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात सट्टा लावणार्‍या विविध राज्यांतील 33 जणांना जेरबंद करण्यात आले. त्यामध्ये आरोपींकडून 74 मोबाईल, 3 लॅपटॉप, 1 टॅब, 8 कॅमेरे, 4 दुर्बीण, एक स्पीकर आणि चार इंडेव्हर मोटार असा 44 लाख 87 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच, 1 लाख 26 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यामध्ये डॉलर, दिरम, पौंड या विदेशी चलनाचा समावेश आहे. कारवाई करत असताना दोन पोलीसांना आरोपींनी धक्काबुक्की केली. तसेच आरडा ओरडा करत दहशत माजवून कोरोना प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *