Bhosari news: खिशातून 26 हजार पडले अन् चोरट्यांनी डाव साधला
Pckhabar- पैसे घेऊन जाताना एका व्यापार्याचे खिशातून 26 हजार रूपये पडले आणि दोन चोरट्यांनी पैसे उचलून पळ काढला. ही घटना पुणे-नाशिक रस्त्यावर भोसरीतील पांजरपोळ येथे घडली.
व्यंकट बाबु वैरागे (वय-47, रा. मोशी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैरागे पुणे-नाशिक रोडने पांजरपोळ येथून जात होते. त्यावेळी त्यांच्या खिशातील 26 हजार रूपये खाली पडले. तेथे जवळच असलेल्या दोन अनोळखी आरोपींनी 26 हजारांची रोकड उचलून स्कुटीवरून पळून गेले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
Bhosari news: खिशातून 26 हजार पडले अन् चोरट्यांनी डाव साधला










Leave a Reply