Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 1 हजार 864 नवे रूग्ण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. सलग तिसर्या दिवशी 1800 पेक्षा अधिक रूग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी शहरात 1 हजार 825 तर हद्दीबाहेरील 39 असे 1864 नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर एकाच दिवशी 13 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 886 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात 1 लाख 30 हजार 572 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 13 हजार 648 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 957 तर हद्दीबाहेरील 827 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 5 हजार 676 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 4 हजार 715 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 1 हजार 85 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 29 घरांना भेटी देऊन 3 हजार 576 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात शुक्रवारअखेर 1 लाख 16 हजार 141 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.










Leave a Reply