Pimpri Corona news: सलग दुसर्‍या दिवशी कोरोना रूग्ण संख्येत वाढ; 1 हजार 818 नवे रूग्ण

Pimpri Corona news: सलग दुसर्‍या दिवशी कोरोना रूग्ण संख्येत वाढ; 1 हजार 818 नवे रूग्ण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. सलग दुसर्‍या दिवशी 1800 पेक्षा अधिक रूग्णांची नोंद झाली आहे.  गुरूवारी शहरात 1 हजार 811 तर हद्दीबाहेरील 7 असे 1818  नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर एकाच दिवशी 13 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 722 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात 1 लाख 28 हजार 747 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 12 हजार 762 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 950  तर हद्दीबाहेरील 821 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरूवारी 4 हजार 124 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 1 हजार 730 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला.  1 हजार 949 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 66 घरांना भेटी देऊन 3 हजार 471 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.  शहरात गुरूवारअखेर 1 लाख 11 हजार 478 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *