Pimpri Corona news: अबब… शहरात एकाच दिवशी 1 हजार 881 नवे रूग्ण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्येचा हाहाकार सुरू झाला आहे. दररोज नव-नवे आकडे वाढत असताना बुधवारी
आढळून आलेली रूग्ण संख्येचा आकडा धडकी भरवणारा आहे. शहरात 1 हजार 865 तर हद्दीबाहेरील 16 असे 1881 नवे रूग्ण सापडले आहेत. गतवर्षीही एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात रूग्ण संख्या आढळून आली नव्हती. त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर एकाच दिवशी 15 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 824 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात 1 लाख 26 हजार 936 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 12 हजार 40 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 943 तर हद्दीबाहेरील 815 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी 4 हजार 133 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 1 हजार 892 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 1 हजार 366 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 273 घरांना भेटी देऊन 4 हजार 85 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात बुधवारअखेर 1 लाख 70 हजार 27 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान, रूग्ण संख्या दररोज नव-नवे रेकॉर्ड करत असताना नागरिक बेफिकीरी करत असल्यामुळे ही वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझर, वारंवार हात धुणे आदी खबरदारीचे उपाय करणे गरजेचे आहे.










Leave a Reply