तळेगाव दाभाडे- तळेगांव दाभाडे नगरपरिषद, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग व रोटरी क्लब ऑफ तळेगांव सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगांव येथील पै विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुलात शंभर बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्याची पाहणी आमदार सुनील शेळके यांनी केली.
पै. विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुल या ठिकाणी हे शंभर बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्याची पाहणी आमदार शेळके, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, तळेगाव दाभाडे आरोग्य केंद्राचे प्रमुख प्रवीण कानडे, नगर रचनाकार शरद पाटील, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष संतोष शेळके, सचिव दीपक फल्ले आदींनी केली.
कोविड सेंटर सुरू करण्याबाबत शासकीय स्तरावरील सर्व परवानग्या रोटरी क्लब तळेगांव सिटी यांना प्रांताधिकारी संदेश शिर्के व नगरपालिका तळेगांव दाभाडे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. मावळ तालुक्यात कोरोना विषाणूचा पादूर्भाव वाढत असल्याने दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तालुक्यात रुग्णांची वाढती संख्या पाहता आमदार शेळके यांनी लोणावळा, तळेगांव, आणि वडगाव या ठिकाणी शंभर बेडची व्यवस्था करण्याचा पाठपुरावा केला होता. व सामाजिक संस्थांना आवाहन केले होते.
त्यांच्या ह्या आव्हानाला रोटरी क्लब तळेगांव सिटीने ‘एक पाऊल पुढे’ येऊन तळेगांव येथील कोविड केअर सेंटरची संपूर्ण जबाबदारी घेण्यास तयारी दर्शविली. या सेंटर मधील रुग्णांसाठी सर्व सोयी सुविधा रोटरी क्लब तळेगाव सिटीच्या मार्फत देण्यात येणार आहे.
भेगडे क्रीडा संकुलात कोविड केअर सेंटर सुरू करण्यास विरोध
येथील पै.विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुल या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यास जेष्ठ नगरसेवक किशोर भेगडे यांनी विरोध केला आहे. मोठी नागरी वस्ती, शाळा, भाजी मार्केट, नवीन व्यापारी संकुल, व कायम रहदारीचा रस्ता आदि बाबी या कोविड केअर सेंटरला लागून असल्याने याठिकाणी हे कोविड केअर सेंटर सुरू करू नये असे निवेदन मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना दिले आहे.
तळेगावातील भेगडे क्रीडा संकुलात शंभर बेडचे कोविड केअर सेंटर होणार सुरू










Leave a Reply