सांगवीत रक्तदान शिबीराला प्रतिसाद

पिंपरी- वाढत्या  कोरोना प्रादुर्भाव व रक्तपेढीत असलेली कमतरता या प्राश्वभूमीवर सांगवी परिसर महेश मंडळतर्फे 21 व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 47 जणांनी रक्तदान केले.
कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन करीत पिंपळे सौदागर येथील शिवम सोसायटीमध्ये आयोजित शिबिराचे उद्घाटन महिला बाल कल्याण समितीच्या सभापती निर्मला कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. राम बांगड, संदीप भोळे, सतीश लोहिया आदी उपस्थित होते. रक्तसंकलनसाठी आचार्य आनंदऋषी पुणे रक्तपेढ़ीने सहकार्य केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी निलेश अटल, पंकज टावरी, संजय मुंदडा, मनोज आरमरकर यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *