Pimpri Corona news: 16 जणांचा मृत्यू, कोरोनाचे 1189 नवे रूग्ण, 846 जणांना डिस्चार्ज

Pimpri Corona news: 16 जणांचा मृत्यू, कोरोनाचे 1189 नवे रूग्ण, 846 जणांना डिस्चार्ज

Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. सोमवारी शहरात 1 हजार 187 तर हद्दीबाहेरील 2 असे 1189  नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर एकाच दिवशी 16 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 846 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात 1 लाख 23 हजार 552 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 10 हजार 404 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 923  तर हद्दीबाहेरील 807 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी 6  हजार 109 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 4 हजार 849 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला.

2 हजार 110 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 457 घरांना भेटी देऊन 4 हजार 870 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.  शहरात सोमवारअखेर 96 हजार 149 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *