Chinchwad crime news:शतपावली करणार्‍या महिलेचे मंगळसुत्र हिसकावले

Chinchwad crime news:शतपावली करणार्‍या महिलेचे मंगळसुत्र हिसकावले
Pckhabar-जेवन झाल्यानंतर शतपावली करणार्‍या महिलेचे स्कुटीवरून आलेल्या अनोळखी तरूणाने त्यांच्या गळ्यातील मोहन माळ, सोन्याची चैन असा 90 हजारांचे दागिने जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले. ही घटना रविवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास चिंचवड येथील तानाजीनगर येथे घडली.

शुभांगी नंदकुमार उंडे (वय-59, रा. तानाजीनगर) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी या रविवारी रात्री जेवन झाल्यानंतर तालेरा हॉस्पिटल समोर शतपावली करत होत्या. यावेळी समोरून आलेल्या स्कुटीवरील तरूणाने त्यांच्या गळ्यातील अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची मोहन माळ, 5 ग्रॅमची सोन्याची चैन असा 90 हजार रूपये किंमतीचे दागिने हिसका मारून नेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *