Pimpri news: रुग्ण वाढल्याने शहरात नवीन निर्बंध; हे आहेत नियम
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने निर्बंध कडक केले आहेत. यामध्ये यलो, ऑरेंज आणि रेड झोनची निर्मिती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.
शहरात आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येनुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. ‘अ’ एकूण लोकसंख्येच्या 5% पेक्षा कमी रुग्णसंख्या आढळलेल्या परिसरास पिवळा भाग (यलो झोन), ‘ब’ – एकूण लोकसंख्येच्या 5 ते 20% रुग्णसंख्या आढळलेल्या परिसरास नारंगी भाग (ऑरेंज झोन) आणि एकूण लोकसंख्येच्या 20% पेक्षा जास्त रुग्णसंख्या आढळलेल्या परिसरास लाल भाग (रेड झोन) घोषित करण्यात येणार आहे. तसे फलक त्या-त्या परिसरात लावले जाणार आहेत.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, विनामास्क वावरणे, सुरक्षित अंतर न ठेवणे, सॅनिटायजरचा सुविधा न करणे याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी 8 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. भाजी मंडई, बाजार पेठ, मजूर अड्डे यांसह इतर गर्दीच्या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात आहे का? नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना सील करण्यासाठी स्वतंत्र 8 पथके नेमण्यात आली आहेत. यात दोन पोलिसांचा समावेश असणार आहे.










Leave a Reply