Article By Dr. Ankush jadhav : कोरोना- फक्त महाराष्ट्राच्याच मागे लागला आहे का?

Article By Dr. Ankush jadhav : कोरोना- फक्त महाराष्ट्राच्याच मागे लागला आहे का?
Pckhabar- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने  जगभरासहित भारतात पुन्हा हाहाकार माजविला आहे. २० प्रमाणे २१ हे वर्ष असेच जाणार का? याची चिंता सर्वांनाच लागून राहिली आहे. पुनः भयभीत व संशयाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. याला कारण आहे २०  मार्चची कोरोनाबाधितांची जाहीर झालेली आकडेवारी.भारतात या दिवशी जवळजवळ ४१ हजार नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. हा गेल्या १११ दिवसातला उच्चांक आहे. तर महाराष्ट्रात  २० मार्च ला २७ हजार पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. हा आतापर्यंत चा एका दिवसातील उच्चांक आहे. चाचण्यात  बाधितांचे प्रमाण १३ टक्के येत आहे.

भारतात २० मार्चला ४१ हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळले. या रुग्णांतील ८३.१४ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात,
व म. प्र. या ६ राज्यात आढळून आले. महाराष्ट्रात सर्वाधिक २७ हजार १३६, पंजाब-२,५७८, केरळ-२०७८, कर्नाटक-१७९८, गुजरात-१५६४, म. प्र.-१३०८. एवढे रुग्ण बाधित आढळले. जेवढे रुग्ण आढळले त्याच्या निम्म्या पेक्षाअधिक वा बहुतांश रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळून आले. महाराष्ट्र सहित तामिळनाडू, पंजाब,म. प्र., दिल्ली, गुजरात, कर्नाटक व केरळ या ८ राज्यातच कोरोना रुग्ण आढळून येताहेत, त्यात ही महाराष्ट्र आघाडीवर.  या आकडेवारी वरून असे वाटते की, कोरोना केवळ महाराष्ट्राच्याच मागे लागला आहे का? ही राज्ये सोडून बाकी राज्यात खरेच रुग्ण आढळून येत नाहीत का? एकवेळ मान्य करू की, याला महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील लोकसंख्येचे प्रमाण, स्थलांतरीत जे दररोज लाखो च्या संख्येच्या येत आहेत व  ते बाधित असतील तर त्यांची नोंद ही व उपचार खर्च ही महाराष्ट्राच्या बोकांडी.  अशीच गर्दी काही प्रमाणात अन्य राज्यात नाही का? तेथे कोरोना बधितांची संख्या कमी वा नाममात्र का आढळून येते? मध्यंतरी बिहार मध्ये विधान सभेच्या निवडणुका झाल्या. तेव्हा कोरोना कुठे नाहीसा झाला होता? आता पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम यासह पाच
राज्यात निवडणूका सुरू आहेत. निवडणूक प्रचाराच्या प्रचंड गर्दीचा दुसरा, तिसरा आठवडा सुरू आहे. पश्चिम बंगाल मध्ये नाममात्र कोरोना आहे.  तेथे का प्रमाण वाढत नाही? बिहार मध्ये कोरोना चाचणीकर्त्या नागरिकांचा मोबाईल क्रमांक सर्रास ०००००००००० असा नोंदल्याचे आढळून आले आहे. त्या बिहारचीही स्थिती नियंत्रणात आहे. काही राज्यात चाचण्यांचे अहवाल २/३सकारात्मक दाखवून  बाकी नकारात्मक दाखविले जातात. गुजरात मधील अहमदाबाद शहरातील”नरेंद्र मोदी स्टेडियम” मध्ये इंग्लंड विरुद्धचे टी-२०चे दोन प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीत पार पडले. उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री श्री.आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत लखनौ जवळ ३५०० हजार पेक्षा अधिक जोडप्यांचा आतापर्यंत चा सर्वात मोठा विक्रमी सामुदायिक विवाह सोहळा नुकताच पार पडला. त्याला किती गर्दी झाली असेल त्याचा तुम्हीच विचार करा? यावेळी कोरोना विषाणू पळून गेला होता का ?  लपून बसला होता?आणि महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी विवाह साठी ५० लोकांची अट पळून ही कोरोना इथल्याच लोकांच्या मागे लागताना दिसत आहे. यावेळी कोरोना विषाणू पळून गेला होता का?महाराष्ट्रातील विदर्भ, नागपूर मध्ये उच्चांकी रुग्ण आढळत आहेत. तर याच्या बाजूलाच असलेल्या म.प्र.,ओडिशा
छत्तीसगड  या राज्यात  नगण्य रुग्ण आढळत आहेत.
गुजरात, कर्नाटकात ही महाराष्ट्रा च्या मानाने फारशी वाढ नाही? छत्तीसगड राज्याची राजधानी असलेल्या रायपूर मध्ये “लिजंड्स” क्रिकेट संघाचे सामने प्रेशकांनी तुडुंब भरलेल्या स्टेडियम होत आहेत. या वेळी कोरोना कुठे जातो?आरोग्य सेवेत महाराष्ट्र अग्रेसर आहे. हे उत्तरे कडील राज्यांत ज्यांनी प्रवास केला आहेत. त्यांना निश्चित मान्य होईल. आरोग्य सेवेचा वणवा असलेल्या उ.प्र., म.प्र., बिहार इ. राज्यातून येणारी कोरोना बाधितांची आकडेवारी निश्चित च योग्य नाही. महाराष्ट्र , केरळ, दिल्ली सोडून अन्य राज्यांतील आकडेवारी त काही तरी गडबड केली जात आहे.  सर्व आकडे “मॅनेज ”  केले जात आहेत. अशी रास्त शंका येते. महाराष्ट्र, केरळ, दिल्ली या राज्यांतील आरोग्य सेवा वा यंत्रणा कार्यक्षम  आहेत. म्हणूनच  या राज्यात अधिक रुग्ण प्रामाणिक पणे नोंदले गेले आहेत व जातात. एका रविवारच्या लोकसत्तेत यावर विस्तृत लेख ही प्रकाशित झाला आहे.

महाराष्ट्र प्रामाणिक पणे कोरोना संबंधित काम करून प्रामाणिक पणे आकडेवारी जाहीर करीत आहे. हे अन्य राज्यातील आकडे पाहिल्यानंतर त्वरित लक्षात येते. महाराष्ट्र, केरळ, दिल्ली येथे सामान्यतः सर्व प्रतिबंधक उपयायांचे पालन केले जात असून ही स्थिती?
निवडणूका, क्रिकेट, सामूहिक विवाह इ.अनेक कारणांनी दुसऱ्या राज्यात ही गर्दी होत आहे , कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही तरी तेथे कोरोना संसर्ग का पसरत नाही?  का तो फक्त महाराष्ट्रा च्याच मागे लागला आहे. ‘दया कुछ तो गडबड है!
डॉ. अंकुश जाधव
नवी मुंबई, इस्लामपूर(सांगली).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *