Pimpri Rto News: आरटीओने जप्त केलेल्या वाहनांचा होणार लिलाव
Pckhabar- पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जप्त केलेल्या वाहनांचा दि. 25 मार्च रोजी ई लिलाव होणार आहे.
यामध्ये बस, ट्रक, डी व्हॅन, पिकअप व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, जेसीबी या वाहनांचा समावेश असून ही वाहने ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर जाहीर ई-लिलावाद्वारे विकली जाणार आहेत. लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन मालकांना कर भरून वाहने सोडवून घेण्याची संधी राहील, असे परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे. ही ई लिलाव प्रक्रिया 25 मार्च 2021 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठेवण्यात आल्याची माहिती कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
मोशी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात 18 मार्च 2021 ते 24 मार्च 2021 या कालावधीत ही वाहने इच्छुक नागरिकांना प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. लिलाव होणार्या वाहनांची यादी नागरिकांच्या माहितीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पुणे शहर व हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव येथील तहसिलदार कार्यालय आणि पिंपरी चिंचवड येथील उप प्रादेशिक कार्यालयाच्या सूचना फलकांवर लावण्यात आली आहे.







Leave a Reply