Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 1442 नवे रूग्ण
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. शनिवारी शहरात 1 हजार 431 तर हद्दीबाहेरील 11 असे 1442 नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नऊ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 623 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात 1 लाख 20 हजार 949 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 8 हजार 766 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 904 तर हद्दीबाहेरील 800 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी 5 हजार 349 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 3 हजार 776 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 1 हजार 524 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 2 हजार 89 घरांना भेटी देऊन 6 हजार 211 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात शनिवारअखेर 91 हजार 424 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.
Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 1442 नवे रूग्ण










Leave a Reply