Talegaon Dabhade News: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान स्मारक समिती गठीत करा – गणेश काकडे
Pckhabar-तळेगाव दाभाडे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्थानाबाबत विविध नियोजन करणे, निर्णय घेणे, आढावा घेणे यासाठी नगरपरिषद सदस्यांची ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान स्मारक समिती’ तत्काळ गठीत करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी केली आहे.
याबाबत नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांना दिलेल्या निवेदनात काकडे यांनी म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे या शहरामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. याठिकाणी भारतीय राज्यघटना लिहिण्याचे ऐतिहासिक कार्य झाले आहे. या वास्तुचे मालक म्हणून तळेगाव दाभाडे नगरपरिषद अशी नोंद आहे. या ठिकाणी देशातील विविध भागातून, तसेच परदेशातूनही अनेक नागरिक भेट देत असतात. यामुळे या जागेस ऐतिहासिक महत्व आहे.
चालू पंचवार्षिकमध्ये समिती गठीत केली नाही
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या ऐतिहासिक वास्तुच्या नुतनीकरणासाठी 1 कोटी 11 लाख इतके अनुदान मंजूर केले आहे. या वास्तुची दैनंदिन देखभाल दुरुस्ती होणे. वास्तुच्या विकासाबाबत व इतर निर्णय घेणे. यासाठी यापूर्वीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नगरपरिषदेच्या सदस्यांची समिती गठीत केली होती. परंतु, या पंचवार्षिकमध्ये मागील चार वर्षांपासून अशी समिती गठीत करण्यात आलेली नाही. यामुळे या वास्तुबाबत कोणतेही विकासकामांचे नगरपरिषद स्तरावर निर्णय घेता येत नाहीत, असे विरोधी पक्षनेते काकडे यांनी निवेदनात म्हटले आहे.










Leave a Reply