Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 1303 नवे रूग्ण

Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 1303 नवे रूग्ण
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. गुरूवारी शहरात 1 हजार 296 तर हद्दीबाहेरील 7 असे 1303  नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नऊ  रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 406 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात 1 लाख 18 हजार 192 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 7 हजार 502 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 893  तर हद्दीबाहेरील 796 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरूवारी 6 हजार 971 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 5 हजार 599 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 1 हजार 582 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.

1 हजार 579 घरांना भेटी देऊन 5 हजार 477 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.  शहरात गुरूवारअखेर 80 हजार 897 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *