Pimpri Corona news: धोका वाढतोय.. नागरिकांनो काळजी घ्या
शहरात आज कोरोनाचे 900 नवे रूग्ण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी कोरोनाचे शहरात 894 तर हद्दीबाहेरील 6 असे 900 नवे रूग्ण सापडले आहेत. पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 552 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहर परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे
शहरात 1 लाख 15 हजार 648 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 6 हजार 481 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 885 तर हद्दीबाहेरील 790 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी 5 हजार 829 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 4 हजार 954 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला.
1 हजार 296 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 363 घरांना भेटी देऊन 4 हजार 730 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरात मंगळवारअखेर 72 हजार 835 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.










Leave a Reply