Pimpri News: भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडीतील गुरुवारचा पाणीपुरवठा बंद राहणार
Pckhabar- राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने येत्या (गुरुवारी) भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
एमआयडीसीच्या रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीचे काम गुरुवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून होणा-या पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी, दिघी, व्हीएसएनएल, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागात गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
शुक्रवारी (दि.19) पाण्याचा पुरवठा हा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करावा. पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीचे उपअभियंता कल्पेश लहिवाल यांनी केले आहे.










Leave a Reply