Dehugaon News: कोरोना लसीकरणाला प्रतिसाद, आजपर्यंत 324 जणांनी घेतली लस

Dehugaon News: कोरोना लसीकरणाला प्रतिसाद, आजपर्यंत 324 जणांनी घेतली लस

 

लसीकरणासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन

Pckhabar- तीर्थक्षेत्र देहूगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये (पीएचसी) बुधवार (दि.10) पासून ‘कोविशिल्ड’ कोरोना लसीचे डोस देण्यास सुरवात करण्यात आली आहे. लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाच दिवसात 324 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी दिली.

 

लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद मिळाला. देहूगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘कोविशिल्ड लस’ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे, पंचायत समिती सदस्या हेमलता काळोखे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. शिवसेनेचे देहूगाव शहरप्रमुख सुनील हगवणे, प्राथमिक आरोग्य कॅंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, डॉ. रणजित कांबळे आदी उपस्थित होते.

 

देहूगाव येथे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेल्या बालेवाडी येथील गिरीश उपाध्याय या 64 वर्षीय वृद्धास प्रथम लस देवून या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला होता. लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज एका दिवसात 128 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. तर, मागील पाच दिवसात 324 जणांनी कोरोनाची लस टोचवून घेतली आहे.

 

”कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित आहे. लस दिल्यानंतर सर्वांना अर्धा तास निरीक्षण कक्षात ठेवण्यात येते. आजपर्यंत 324 जणांनी लस टोचून घेतली आहे.  लसी करणासाठी जास्तीत-जास्त नागरिकांनी नोंदणी करावी”, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *