Bhosari news: वेदिका शिंदेच्या उपचारासाठी माजी महापौर राहुल जाधव यांचा मदतीचा हात

Bhosari news: वेदिका शिंदेच्या उपचारासाठी माजी महापौर राहुल जाधव यांचा मदतीचा हात
Pckhabar- SMA (Spinal muscular atrophy ) सारख्या दुर्धर आजाराशी लढणाऱ्या वेदिका शिंदेच्या उपचारासाठी माजी महापौर विद्यमान नगरसेवक राहुल जाधव यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून 1 लाख 1 हजार रुपयांची मदत केली आहे.

जाधव यांनी वेदिकाचे वडील सौरभ शिंदे आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

जाधव यांनी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शना खाली वाढदिवसाचा इतर खर्च टाळून विविध सामाजिक उपक्रमा द्वारे वाढदिवस साजरा केला.

कोरोन महामारीच्या या संकटाच्या काळा मध्ये वाढदिवसाचा अनाठाई खर्च टाळून वेदिकाच्या पालकांना एक मदतीचा हात देऊन समजा मध्ये सामाजिक बांधिलकीचा एक संदेश दिला आहे. यावेळी वेदिकाच्या वडिलांनी आमदार महेश लांडगे आणि राहुल जाधव यांचे आभार मानले.
राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जाधववाडी परिसर मध्ये आज विविध सामाजउपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रभाग मध्ये वृक्षारोपण तसेच प्रभागातील नागरिकांना रोप वाटप, प्रभागातील महिला सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला. त्याच प्रमाणे अनाथ मुलांसाठी अनधान्य वाटप इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोन महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पळून अगदी मोजक्याच कार्यकर्त्याच्या उपस्थिती मध्ये हा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या वेळी बोलताना माजी महापौर राहुल जाधव म्हणाले की आपण समाजचे काही देन लागतो, ज्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मि या शहराचा महापौर झालो सलग दोन निवडणुकामध्ये भरघोष मतदानाने निवडून आलो त्या लोकांसाठी नेहमी काहीना काही नवीन करण्याची प्रेरणा जनतेच्या प्रेमानेच मिळते. यापुढील आयुष्यामध्ये गोरगरीब जनते साठी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शना खाली नेहमी तत्पर राहील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *