Pimpri news: वेदिका शिंदे हिच्या मदतीसाठी पंंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना साकडे
Pckhabar- मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीने कु. वेदिका शिंदे हिच्या दुर्जर आजारासाठी पंंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्याकडे मदतीसाठी साकडे घालण्यात आले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संस्थेच्या वतीने निवेदन देऊन मदत करण्यासाठी भावनिक आव्हान केले आहे. अवघ्या आठ महीन्याची चिमुकली कु.वेदिका शिंदे हिला स्पायनल मस्कुराल अँट्राफी(spinal muscular atrophy) टाईप 1 हा दुर्जर आजार झाला असुन हा आजार खूप जलद गतीने स्नायू व नसा कमकुवत करतो. यामुळे जसजसा आधिक वेळ वाया जाईल तसतसे श्वास घेणे, चालणे, मान धरणे, या क्रियावर अत्यंत जलद गतीने प्राण घातक हल्ला चढविला जातो. सध्या कु.वेदिका शिंदे पुण्यातील दिनानाथ मंंगेशकर रूग्णालयात उपचार घेत आहे. या आजारासाठी अमेरिकेतुन झोलमेंन्समा (zolgensma)
हि लस मागवावी लागेल. या लसीची किंमत 16 कोटी रुपये आहे. आई स्नेहा शिंदे व वडील सौरभ शिंदे याची एकुलती एक मुलगी आहे. हा खर्च त्यांना न परवडणारा आहे. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेने दोन दोन रुपये जरी प्रत्येकाचे दिले तरी तिचा जीव वाचवू शकतो.
शहराध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले की, देशाचे पंतप्रधान हे अत्यंत गरीबी परीस्थितीतून गेलेले व्यक्ती मत्त्व आहे त्यांना गरीबीची व आर्थिक परीस्थितीची जाण आहे. यामुळे पंतप्रधान निश्चित मदत करतील. औषधावरील कर ही माफ करतील व महाराष्ट्रातीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ही मदत करतील व नागरीकांनी ही सढळ हाताने मदत करण्याचे आव्हान जोगदंड यांनी केले.
निवेदनावर संस्थापक विकास कुचेकर , शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, महिला अध्याक्षा संगिता जोगदंड, आळंदी सचिव रवी भेंकी मुरलीधर दळवी, गजानन धाराशिवकर यांच्या सहया आहेत.
नागरिकांनी सौरभ शिंदे यांच्या 9922098885 या मोबाईल नंबर वर फोन पे, गुगल पे, पेटिएमवर ही मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.










Leave a Reply