Bhosari news: रक्तदान शिबिरात 227 जणांचा सहरभाग
Pckhabar- संत निरंकारी मिशन अंतर्गत, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन पुणे झोन च्या माध्यमातून भोसरी सेक्टर अंतर्गत मोरेवस्ती ब्रँच येथे रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात 227 जणांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष यश साने, पांडूरंग सान, नगसेवक कुंदन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराला ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रभारी) तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
यामध्ये ससून रुग्णालय रक्तपेढी, वाय. सी. एम. रुग्णालय रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांनी 227 युनिट रक्त संकलन केले, विशेषतः या शिबिरात अंध व्यक्ती भीमराव साळुंखे यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात आपला सहभाग दर्शविला.
कोरोनामुळे अनेक रुग्णांना रक्त,प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा या सर्वांची अत्यंत आवश्यकता भासत आहे, त्यामुळे संत निरंकारी मिशनद्वारे एप्रिल 2020 पासून आतापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये 21 रक्तदान शिबीर संपन्न झाली आहेत या मध्ये 2128 युनिट रक्त संकलन ससून रुग्णालय रक्तपेढी, वाय. सी.एम. रुग्णालय रक्तपेढी, कमांड रुग्णालय रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांच्या मार्फत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे फौंडेशनच्या स्वयंसेवकांनी अनेक वेळा आवश्यकतेनुसार प्लाझ्मादान करून अनेक कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवले. या रक्तदान शिबिरात आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार अंगद जाधव, सचिन महानोर यांनी केले.










Leave a Reply