Dighi News: मी जबाबदार.. माझी जबाबदारी जनजागृती मोहीम
Pckhabar-कोरोना संसर्गाचा शहरामध्ये आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण संख्या ८०० हून अधिक झाली आहे. त्यामुळे दिघी विकास मंचाच्या वतीने ” मी जबाबदार.. माझी जबाबदारी ”…ही जनजागृती मोहिम राबवून नागरिकांना कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
शहरामध्ये एकुण रुग्णांची संख्या १ लाख 14 हजार 26 इतकी आहे. ही शहरवासीयांसाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे दिघी विकास मंचाच्या वतीने आज रविवारी जनजागृती करण्यात आली.
निष्काळजीपणे वावरणाऱ्या महिला व पुरुषांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी दिघी विकास मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ लबडे , सुनिल काकडे , के के जगताप , पुंडलिक सैंदाणे , पांडूरंग मेहत्रे , दत्ता घुले , समाधान कांबळे , नामदेव रडे ,संतोष जाधव, योगेश आकुलवार, पोळ साहेब, आदी सदस्य उपस्थित होते.










Leave a Reply