Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 811 नवे रूग्ण

Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 811 नवे रूग्ण
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी कोरोनाचे 811 नवे रूग्ण सापडले आहेत. चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 487 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात 1 लाख 13 हजार 181 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 4  हजार 853 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 872  तर हद्दीबाहेरील 789 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी 2 हजार 839 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 1 हजार 733 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला.
1 हजार 786 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 956 घरांना भेटी देऊन 6 हजार 422 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरात शनिवारअखेर 61 हजार 876 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *