Dighi News: पाणीपुरवठा विस्कळीत, नगरसेवक विकास डोळस यांचा अधिका-यांना घेराव
Pckhabar-मागील पंधरा दिवसांपासून दिघी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने स्थानिक नगरसेवक विकास डोळस यांनी अधिका-यांना फैलावर घेतले. विस्कळीत पाणीपुरवठ्याचा जाब विचारत अधिका-यांना घेराव घातला.
दिघीतील काटेवस्ती, विजयनगर, दिघी गावठाणचा काही भाग, पाटील आळी, तापकीर आळी, समर्थनगर, चौधरनगर या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. विस्कळीत पाणीपुरवठ्याचे कारण विचारले असता कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आणि प्लबर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे नगरसेवक विकास डोळस आणि संतप्त नागरिकांनी अधिका-यांना घेराव घातला. तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
…तर दररोज पाणीपुरवठा करावा – विकास डोळस
नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. दिवसाआड पाणीपुरवठा असतानाही विस्कळीतपणा येत आहे. लोकांचे हाल होत आहेत. असे होत असेल तर दररोज पाणीपुरवठा करावा, अशी मागणीही नगरसेवक डोळस यांनी केली.










Leave a Reply