Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 858 नवे रूग्ण

Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 858 नवे रूग्ण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात शु्रकवारी कोरोनाचे 858 नवे रूग्ण सापडले आहेत. चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 476 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात 1 लाख 12 हजार 370 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 4  हजार 366 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 870  तर हद्दीबाहेरील 787  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 2 हजार 791 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले.

1 हजार 777 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 1 हजार 491 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 597 घरांना भेटी देऊन 5 हजार 813 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरात शुक्रवारअखेर 56 हजार 273 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.