Pimpri Corona news: शहरात कोरोनाचा वाढता कहर , आज 834 नवीन रुग्ण

Pimpri Corona news: शहरात कोरोनाचा वाढता कहर , आज 834 नवीन रुग्ण
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. शहराच्या विविध भागातील 812 आणि महापालिका हद्दीबाहेरील 22 अशा 834 नवीन रुग्णांची (गुरूवारी) नोंद झाली आहे.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 373 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील तीन आणि महापालिका हद्दीबाहेरील दोन अशा पाच जणांचा आज मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 11 हजार 515 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 3890 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1866 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 787 अशा 2653 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1281 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1332 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 51 हजार 870 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 3577 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.