Pimpri news: मृत्यूपत्र करणे ही काळाची गरज : अॅड. प्रीती साठे
Pckhabar- समाजातील, कुटुंबातील महिलांचे स्थान महत्वाचे आहे. कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंबातील प्रत्येकाला आर्थिक संपत्तीचा सर्वाना व्यवस्थित लाभ घेता यावा यासाठी मृत्यू आधी आपले मृत्यूपत्र करणे ही काळाची गरज आहे, असे मत अॅड. प्रीती साठे यांनी व्यक्त केले.
कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा ज्युनियर कॉलेज व टी. जे. एस. बी. बैंकेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अॅड. साठे बोलत होत्या.
टी. जे.एस.बी.बँकेचे मॅनेंजर दीपक देशपांडे यांनी महिलांना गुंतवणुकीच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच महिला अध्यापिकांना भविष्याचा विचार करिता बँकेमध्ये गुंतवणूक करण्यास सांगुन स्वावलंबी बनण्याचा मंञ दिला. कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वनिता कुर्हाडे यांनी महिला शिक्षकांना विविध कला गुणदर्शन सादर करण्यास संधी दिली. यामध्ये महिला शिक्षकांनी विविध खेळ, अभिनय, गायन, नृत्य इ.चे सादरीकरण केले.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ.दीपक शहा, प्राचार्य डॉ.बाबासाहेब सांगळे, उपप्रचर्या डॉ .वनिता कुर्हाडे, डॉ. क्षितिजा गांधी, डॉ. पौणिमा कदम आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.सुकन्या बॅनर्जी यांनी केल. प्रा.शबाना शेख यांनी आभार मानले.










Leave a Reply