Chinchwad news: अत्याचार घडल्यास निसंकोचपणे त्वरित पोलिस ठाण्यात तक्रार करा  : पोलिस उपनिरीक्षक निता उबाळे

Chinchwad news: अत्याचार घडल्यास निसंकोचपणे त्वरित पोलिस ठाण्यात तक्रार करा  : पोलिस उपनिरीक्षक निता उबाळे
Pckhabar-समाजात महिलांवर अत्याचार घडल्यास त्या घाबरुन घरात बसतात, अत्याचार घडल्यास त्वरित पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार करा, जेणेकरून नराधमांना त्वरीत पकडता येईल. पोलिस तुमच्यासाठीच असून न घाबरता पुढे येण्याची आवश्यकता आहे, असे मत पोलिस उपनिरीक्षक निता उबाळे यांनी व्यक्त केले.

सप्ततारा फाऊंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहरातील विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी केलेल्या 40 महिलांचा सन्मानपत्र भेटवस्तू पोलिस उपनिरीक्षक निता उबाळे, मेघना प्लॉस्ट टेक्नॉलॉजीस्ट इंडिया प्रा.लि. कंपनीच्या कार्यकारी संचालिका राजश्री गागरे, माजी नगरसेवक संदिप चिंचवडे आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आले.  त्यावेळी उबाळे  बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावरती सप्ततारा फाऊंडेशनच्या अध्यक्षा व कार्यक्रमाचे मुख्य आयोजिका रुपाली भडाळे, संस्थेच्या सचिव साधना दातीर, रविंद्रकुमार भडाळे, शमा धुमाळ आदी उपस्थित होते.

उद्योजिका राजश्री गागरे म्हणाल्या, महिलांना संघटीतपणे एकत्र येवून व्यवसायाची सुरुवात करावी. प्रसंगी प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यासाठी मला कधीही संपर्क साधल्यास मदतीसाठी मी सदैव तयार आहे. व्यवसाय क्षेत्रात पुढाकार घेवून स्वावलंबी बना असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना साधना दातीर यांनी केले. आभार अध्यक्षा रुपाली भडाळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी वैभव धस, अ‍ॅड. दिलीप शिंगोटे, वंदना कोल्हापूरे, हेमा वाळके आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *