Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 635 नवे रूग्ण, 479 जणांना डिस्चार्ज

Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 635 नवे रूग्ण, 479 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी कोरोनाचे 635 नवे रूग्ण सापडले आहेत. पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 479 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात 1 लाख 10 हजार 70 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 3 हजार 232 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 861  तर हद्दीबाहेरील 785 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी 4 हजार 337 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 3 हजार 588 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 911 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.

1 हजार 280 घरांना भेटी देऊन 4 हजार 452 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरात मंगळवारअखेर 43 हजार 271 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *