Talegaon Dabhade news: सिध्दीविनायक नेस्टमध्ये महिला दिन उत्साहात साजरा
Pckhabar- सिद्धिविनायक नेस्ट गृहनिर्माण सोसायटीमध्ये जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व महिलांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

मोहननगर येथील सिध्दीविनायक नेस्ट सोसायटीमधील महिलांची इंद्रायणी ऑप्टिकलतर्फे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
महिलांनी रॅम्प वाॅक सादर केला. उखाणे घेतले. लहान मुलांनी ‘जागतिक महिला दिन’ या विषयावर उत्कृष्ट अशी भाषणे झाली. तसेच मुलांचा डान्सचा कार्यक्रम झाला. जेवनाचा आस्वाद घेतल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी रूक्मिणी पवार आणि श्रद्धा गोरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा गोरे यांनी तर ज्योतीराम गोरे यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजश्री आल्हाट, गीतांजली गुरव, विमला जलोरा, रुक्मिणी पवार, श्रद्धा गोरे, राणी नंदीवाले, वर्षा पडघन, मेघा गुडघे, रेखा खंदारे, रूपाली मेदघे, अश्विनी शिंदे, मयुरी तावरे, भावना बोरसे, तनुजा यादव, दिपज्योती यादव यांनी परीश्रम घेतले.










Leave a Reply