Dighi News: पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनतर्फे महिला पोलिसांचा सन्मान
Pckhabar- जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनतर्फे दिघी पोलीस ठाण्यातील महिला पोलिसांचा सन्मान करण्यात आला.

दिघी पोलीस स्टेशन येथे २४ तास नागरिकांच्या रक्षणासाठी कायदाचे पालन करत दिवस रात्र कर्तव्यदक्ष महिला पोलीस कर्मचारी यांना सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी दिघी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन शिंदे, पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनचे
संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे, युवक अध्यक्ष शुभम चिंचवडे, संस्थेचे पदाधिकारी सागर म्हस्के, सचिन लाड शहराध्यक्ष भाग्यदेव घुले, उपाध्यक्ष दत्ता घुले, कार्याध्यक्ष पराग जोशी, कार्तिक गोवर्धन, प्रसाद माळगावकर, वैभव हेंद्रे, चेतन घुले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन कार्तिक गोवर्धन यांनी केले.










Leave a Reply