Pimpri news: शहरात कोरोनाचे 401 नवे रूग्ण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी कोरोनाचे 401 नवे रूग्ण सापडले आहेत. पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 414 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात 1 लाख 9 हजार 435 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 2 हजार 753 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 859 तर हद्दीबाहेरील 782 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी 2 हजार 392 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 2 हजार 682 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 797 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 874 घरांना भेटी देऊन 2 हजार 978 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरात सोमवारअखेर 39 हजार 34 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.










Leave a Reply