Dehu News: देहूगाव परिसरात धोका वाढतोय, 40 सक्रिय कोरोना रुग्ण !
Pckhabar- देहूगाव परिसरात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. देहूगाव परिसरात 40 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव यांनी दिली.
देहूगाव परिसरात अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसवत आहेत. विना मास्क फिरत आहेत, सुरक्षित अंतराचे पालन करत नाहीत, यासह नागरिक शासनाने दिलेले नियमांचे पालन करत नसल्याने दिसून येत आहे. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहेत.
दरम्यान, गाथा मंदिर परिसरात सर्वाधिक 18, इंद्रायणी सोसायटी चव्हाण नगर भाग -2 मध्ये 10, माळीनगरमध्ये 8 तर विठ्ठलवाडी 4 असे 40 कोरोना रूग्ण सक्रिय आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून विना कारण बाहेर फिरू नये. मास्क आणि सुरक्षित अंतराचे पालन करावे, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव यांनी केले आहे. तसेच ज्यांना यापूर्वी कोरोना होऊन गेला आहे, त्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असेही डॉ. यादव म्हणाले.










Leave a Reply