Talegaon Dabhade news: बड्या थकबाकीदार मालमत्ता धारकांना नगरपालिकेने पाठविल्या नोटीसा
Pckhabar-तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने तळेगाव शहरातील मोठी थकबाकी असलेल्या मिळकतदारांना करसंकलन विभागाकडून मालमत्ता जप्त करण्याच्या नोटीसा बजावल्याने एकच खळबळ उडाली आहे. कठोर कारवाई होणार असल्याने कर भरणा करण्यासाठी मिळकतदारांची गर्दी होत आहे.
तळेगाव शहरात एकून ३५ हजार मिळकतदार आहेत. या सर्व मिळकतदारांकडे एकूण सर्व प्रकारची २९ कोटी ३८ लाख ६३ हजार ९७० रुपये हि वसुली येणे होती. मागील ११ महिन्यात यापैकी अवघी ८ कोटी ३९ लाख २७ हजार १९७ रुपये वसुली झाली आहे. तर सुमारे २१ कोटी, ३९ लाख ५५ हजार एवढी थकबाकी येणे आहे. असे कर निरीक्षक विजय शहाणे यांनी सांगितले.
कर संकलन विभागाला एवढी मोठी थकबाकी वसुलीसाठी अवघे तीन आठवडे बाकी राहिले असताना सर्व करसंकलन विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले असून कठोर उपाय योजना करण्यासाठी कडक धोरण अवलंबत आहे. यामध्ये नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करण्यासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जाहिरात फलक, जप्तीच्या नोटीसा पाठविणे, वृत्तापात्राव्दरे थकबाकीदारांची नावे जाहीर करणे आदि उपाय करण्यात येत आहे.
दरम्यान, करवसुलीमध्ये शहरातील मोबाईल टावर, कोरोनामुळे थकलेली थकबाकी,कोर्टातील थकबाकीच्या केसेस, शासकीय कार्यालयाच्या इमारती वरील अनेक वर्षाची थकबाकी अश्या बाबी करवसुली मध्ये संमाविष्ट आहेत.










Leave a Reply