Pimpri Corona news: शहरात आज 629 नवीन रुग्णांची नोंद, 405 कोरोनामुक्त, एक मृत्यू

Pimpri Corona news: शहरात आज 629 नवीन रुग्णांची नोंद, 405 कोरोनामुक्त, एक मृत्यू
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 629 नवीन रुग्णांची आज  (रविवारी) नोंद झाली आहे.  ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 107 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 405 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. खेड येथील 41 वर्षीय  महिलेचा  आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 9034 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 2339 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1856 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 780 अशा 2636 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1237 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1488 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *