Pimpri News: चार वर्षात प्रभाग एकमध्ये झाले दुप्पट मतदार

Pimpri News: चार वर्षात प्रभाग एकमध्ये झाले दुप्पट मतदार
Pckhabar-तीन पोटनिवडणुकांसाठी महापालिकेने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून प्रभाग क्रमांक एक चिखलीमध्ये चार वर्षात दुप्पट मतदार वाढले आहेत. प्रभागात 66 हजार 142, प्रभाग क्रमांक 4 दिघी बोपखेलमध्ये 42 हजार 433 आणि प्रभाग क्रमांक 14 काळभोरनगर, आकुर्डीत 50 हजार 289 जण पोटनिवडणुकीसाठी  मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने पोटनिवडणुकीसाठीची प्रभानिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. प्रभाग क्रमांक 1 तळवडे गावठाण, चिखलीत महिला 29 हजार 504,  पुरुष 36 हजार 634 आणि इतर 4 असे एकूण 66 हजार 142 मतदार आहेत. 2017 च्या निवडणुकीत 33 हजार 794 मतदारसंख्या होती. चार वर्षात प्रभागात दुप्पटीने मतदार वाढ झाली आहे.

प्रभाग क्रमांक 4 दिघी बोपखेलमध्ये 19 हजार 599 महिला, 22 हजार 833 पुरुष आणि 1 इतर असे एकूण 42 हजार 433 मतदार आहेत. 2017 च्या निवडणुकीत 36 हजार 666 मतदारांची संख्या होती. 5 हजार 767 मतदार वाढले आहेत. तर, प्रभाग क्रमांक 14 काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, दत्तवाडी, आकुर्डी गावठाणात 23 हजार 301 महिला, 26 हजार 987 पुरुष आणि इतर 1 असे 50 हजार 289 मतदार आहेत.   2017 च्या निवडणुकीत 45 हजार 704 मतदार संख्या होती.  चार वर्षात 4 हजार 585 मतदार प्रभागात वाढले आहेत.

दरम्यान, प्रभाग क्रमांक 1 चिखली मधून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे 4 जुलै 2020 रोजी, प्रभाग क्रमांक 14 काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, दत्तवाडी प्रभागातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांचे कोरोनामुळे 31 जुलै 2020 रोजी आणि प्रभाग क्रमांक चार दिघी-बोपखेलमधून निवडून आलेले भाजपचे लक्ष्मण उंडे यांचे 26 सप्टेंबर 2020 रोजी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणूक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *