Pimpri Corona news: तीन महिन्यानंतर उच्चांकी रुग्ण वाढ

Pimpri Corona news: तीन महिन्यानंतर उच्चांकी रुग्ण वाढ
505 नवे रूग्ण
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी 483 तर हद्दीबाहेरील 22  असे 505 नवे रूग्ण सापडले आहेत. एकाही रूग्णांचा मृत्यू झाला नाही. 155  जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात 1 लाख 6 हजार 728 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 1100 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 850 तर हद्दीबाहेरील 776 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बुधवारी 3 हजार 832 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 3 हजार 132 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 918 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 797 घरांना भेटी देऊन 2 हजार 498 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *