Dighi News:  रेडझोनमधील अनधिकृत प्लॉटींगवर कारवाई

Dighi News:  रेडझोनमधील अनधिकृत प्लॉटींगवर कारवाई
Pckhabar- दिघी येथील गणेशनगर अनधिकृत भू-रेखांकन आणि विकास  स.नं. 76 येथील रेडझोन हद्दीमधील सुरू असलेली अनधिकृत प्लॉटींगवर पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुधवारी कारवाई केली.

या ठिकाणी 75 हजार 320 चौ. फूट सिमेंटचे काम काढून टाकण्यात आले. ही कारवाई सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, हेमंत देसाई, के. ए. सगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी 1 पीएसआय, 10 पोलीस, 6 महिला पोलीस, 15 मजुर, 2 जेसीबी, 2 डंपर यांच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.

दरम्यान, नागरिकांनी रेडझोन मधील जागा खरेदी करून आपली फसवणूक करुन घेऊ नये. भोसरीत रेडझोन मधील जागा खरेदी करून काही नागरिकांनी घरे बांधली होती. मात्र, ही घरे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने वेळोवेळी पाडली आहेत. त्यामुळे रेडझोन मधील जागा खरेदी करू नये, असे आवाहन pckhabar. Com च्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *