Dehu News: देहूकरांनो गाफील राहू नका… कोरोना रूग्ण संख्या वाढतेय
Pckhabar- देहूगाव परिसरात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. दोन दिवसात नऊ कोरोना रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव यांनी दिली.
देहूगाव परिसरात अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरत आहेत, सुरक्षित अंतराचे पालन करत नाहीत, यासह नागरिक शासनाने दिलेले नियमांचे पालन करत नसल्याने दिसून येत आहे. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याचप्रमाणे रेपिड अॅन्टिजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर तपासणीची फी जास्त असल्याने सर्दी, खोकला, ताप अशा आजाराचे रुग्ण किंवा कोरोना संशयित रुग्ण तपासणी न करता घरातच राहतात. यामुळे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.
देहूमधील भक्त निवासमध्ये कोविड सेंटर सुरू केले होते. तेथे ॲन्टिजेन टेस्ट केली जात होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हे सेंटर बंद करण्यात आले आहे. आता पुन्हा कोरोना रुग्ण वाढत असल्याने देहूत ॲन्टिजेन टेस्ट केंद्र सुरू करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.










Leave a Reply