Mumbai News: महाविकास आघाडी सरकारकडून प्रत्येक घटकाला न्याय : आमदार सुनील शेळके
Pckhabar-राज्यावर आलेली नैसर्गिक आपत्ती असो किंवा कोरोना महामारीसारखे भीषण संकट असो, या काळात राज्य सरकारने चांगले काम केले आहे. सरकार प्रत्येक घटकाला न्याय देत आहे, त्याबद्दल मी मावळच्या जनतेतर्फे सरकारचे आभार मानतो, असे मनोगत आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान व्यक्त केले. तसेच सरकार प्रत्येक घटकाला न्याय देत आहे. त्याबद्दल शेळके यांनी राज्य सरकारचे आभार मानले.
मावळ-खेड-शिरूर या तालुक्यांमध्ये औद्योगिक हब आहेत. त्यातून तरुणांना रोजगार मिळायला हवा ही आमची मागणी आहे. या भागातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं जात आहे. कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये अशी विनंती केली असता कंपन्या केंद्र सरकारचा जीआर दाखवतात. यातून तरुणांना देशोधडीला लावण्याचे काम कंपन्यांनी केले असल्याचा आरोप शेळके यांनी केला. या भागात केवळ स्थानिक भूमीपुत्र नसून राज्यातील अनेक भागातून तरुण येथे आले आहेत. मावळ तालुक्यातील मावळ्यांच्या नादी कोणी लागू नका, त्यांचा उद्रेक होऊ देऊ नका, असे ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारने मावळ भागासाठी शेकडो कोटींचा निधी दिला आहे. हे सरकार प्रत्येक घटकाला न्याय देत आहे. त्याबद्दल शेळके यांनी राज्य सरकारचे आभार मानले.










Leave a Reply