Pimpri news: कोरोना रोखण्यात महापालिका प्रशासन अपयशी

Pimpri news: कोरोना रोखण्यात महापालिका प्रशासन अपयशी

Pckhabar-पिंपरी चिंचवड शहरात वाढत असलेल्या कोरोनाला रोखण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले असून यासाठी प्रशासनाचे चुकीचे नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला आहे. यासंदर्भात वाघेरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.

याविषयी बोलताना वाघेरे म्हणाले की, आत्तापर्यंत शहरामध्ये जवळपास १ लाख कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. तर २५०० पेक्षा जास्त नागरिकांना या विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शहरातील आरोग्य यंत्रणा मेहनत घेत असली तरी, कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसून येत नाही. मागील आठवड्याभरात शहरामध्ये दररोज ३०० पेक्षा जास्त रुग्णसंख्या आढळून आलेली आहे. झपाट्याने वाढत असलेल्या या रुग्णासंख्येमुळे शहरातील नागरिकामध्ये चिंतेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सध्याचा प्रशासनाचा चुकीचा कारभार पाहता यासाठी सक्षम अधिकार्‍याची निवड करणे गरजेचे आहे असे वाघेरे यांनी निवेदनात म्हंटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *