ACB Crime news: लाच घेताना वैद्यकीय अधिकार्याला रंगेहाथ पकडले
Pckhabar- 19 कामगारांची रॅपिड अॅटिजेनची तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल देण्यासाठी लाच घेणार्या वैद्यकीय अधिकार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (सोमवार) दौंड येथील शासकीय रूग्णालयात करण्यात आली.
मिलिंद दामोदर कांबळे (वय-38) असे लाच घेणार्या वैद्यकीय अधिकार्याचे नाव आहे. कांबळे हे दौंड येथील शासकीय रूग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत कंत्राटी पध्दतीने नेमणूक केलेले वैद्यकीय अधिकारी आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारकर्त्यांनी त्यांच्या कंपनीतील 19 कामगारांची दौंड येथील शासकीय रूग्णालयात कोरोनाची रॅपिड अॅटिजेन तपासणी केली होती. या तपासणीचा अहवाल देण्यासाठी आरोपी कांबळे याने प्रत्येकी 100 रूपये म्हमाणे 1900 रूपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 1500 रूपये देण्याचे ठरले. सोमवारी लाच स्वीकारताना आरोपी कांबळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
आरोपीवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.










Leave a Reply