Talegaon Dabhade news: स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपकडून 12 जण इच्छूक

Talegaon Dabhade news: स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपकडून 12 जण इच्छूक
Pckhabar- तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदाकरिता  भारतीय जनता पक्षाकडे 12 जणांनी मागणी केली असून पक्षश्रेष्ठी  यातून कोणाची वर्णी लावते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

नगरपरिषदेतील भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत सदस्य सुरेश दाभाडे यांचा राजीनामा जिल्हाधिकारी यांनी  मंजूर करतात स्वीकृत सदस्यांच्या एका जागेकरिता पक्षाकडे इच्छुकांची झुंबड उडाली आहे.

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष रवींद्र माने यांचेकडे पक्षाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केली आहे. यामध्ये

भाजपा त.दा.शहर सरचिटणीस प्रमोद देशक, सह्याद्री इंग्लिश स्कूल अध्यक्ष सुनिल भेगडे, शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष नितीन  पोटे, युवा उद्योजक  चिराग खांडगे, भाजयुमो मावळ तालुकाध्यक्ष संदिप  काकडे, माजी चिटणीस राहुल पारगे, शहर कोषाध्यक्ष सतिष राऊत, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा ज्योती जाधव, दिलीप सुतार, अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष सुनिल  कांबळे, माजी भाजयुमो अध्यक्ष सूरज  सातकर, ज्येष्ठ कार्यकर्ते संजय  वाडेकर यांचा समावेश आहे.

भारतीय जनता पक्षाची कार्ड कमिटी याबाबत निर्णय करणार असल्याचे शहराध्यक्ष श्री माने यांनी यावेळी सांगितले.

नगरपरिषदेतील जनसेवा विकास आघाडीने स्वीकृत सदस्य रवींद्र आवारे यांचाही  राजीनामा मंजूर झालेला आहे. त्यांच्या जागेवर जनसेवा विकास समिती कोणाला संधी देते याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. याबाबत जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *