Dehu BJP News: देहू भाजपतर्फे आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार
Pckhabar-आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र देहू नगरीत भेट देऊन जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी
संत तुकाराम महाराज संस्थान, देहू शहर भाजप, समस्थ धनगर महासंघ देहू ग्रामस्थांच्या वतीने मंदिरात सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी देहू देवस्थानचे विश्वस्त संजय महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, भाजपा देहू शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, देहू धनगर महासंघाचे देहुचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत काळे बाग, देहू भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक नाना सकोरे, ज्येष्ठ भाजपा नेत्या सोनाली घोडेकर, आदर्श उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे , माजी उपसरपंच संतोष हगवणे , कार्याध्यक्ष प्रकाश उर्फ राईबा मोरे इनामदार, उमेश शिंदे, विद्यार्थी सरचिटणीस अभय पडोसकर, देहू भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील घोडेकर, उपाध्यक्ष मावळ तालुका भारतीय जनता पक्ष संभाजी टिळेकर, युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध काळोखे, पुणे जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल टिळेकर, सरचिटणीस सागर मुसुडगे, उपाध्यक्ष सचिन काळोखे, किसान आघाडी उपाध्यक्ष संभाजी बाळसराफ, विमुक्त आघाडी अध्यक्ष पोपट पवार, युवा नेते सचिन मराठे, युवा नेते सागर हगवणे, अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष सुदाम कांबळे, सोशल मीडिया प्रभारी सोमा शेळके, दिना कराळे, व्यापारी आघाडी करवीर शिवलिंग आदी मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार पडळकर यांच्याशी संस्थान ऑफिसमध्ये विविध विषयावर, समस्यांवर चर्चा केली. ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतो अशी ग्वाही दिली.










Leave a Reply