Dighi News: कुसुमाग्रजांना मराठी भाषा जनजागृती सायकल रॅलीतुन अभिवादन
Pckhabar-२७ फेब्रुवारी मराठी राज्यभाषा दिन म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कते क्रांतीकवी साहित्यिक कुसुमाग्रजांचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणुन साजरा केला जातो.
सायकलपटू दत्ता आनंदा घुले दिघी – लोहगड – एकविरादेवी कार्ले – दिघी या मराठी भाषा जनजागृती सायकल रॅली मोहिमेतून वि.वा.शिरवाडकर यांना अभिवादन अर्पण करत मराठी राज्यभाषा दिवस साजरा केला.
यानिमित्तानेच डिजिटल फॅशन, मोबाईलच्या दुनियेत मराठी भाषाचा वापर व विस्तार जास्तीत जास्त व्हावा या साठी महाराष्ट्रातील साहित्यिकांचे अजारामर मराठी ग्रंथ , कादंबरी , संतवाणी , वाड्मय , सुविचार याचे सायकलला फलक लावुन जास्तीत जास्त प्रचार व प्रसार व्हावा म्हणूनच सायकलपटू दत्ता आनंदा घुले दिघी – लोहगड – एकविरादेवी कार्ले – दिघी या मराठी भाषा जनजागृती सायकल रॅली मोहिमेतून वि.वा.शिरवाडकर यांना अभिवादन अर्पण करत मराठी राज्यभाषा दिवस साजरा करण्यात आले.
यावेळी मराठी ग्रंथ व कांदबरी आसणारे टि शर्टचे आणावरण करत पुष्पहार देत रॅलीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी दिघी विकास मंचाचे अध्यक्ष हारी लबडे, सल्लागार सुनिल काकडे, के के जगताप, कार्यध्यक्ष धनंजय खाडे , सुनिल कदम , आनंदा घुले उपस्थित होते.










Leave a Reply