Dehu news: शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटकपदी : शैलाताई खंडागळे
Pckhabar- शिवसेनेच्या महिला पुणे जिल्हा संघटकपदी जिल्हा परिषदेच्या सदस्या शैलाताई खंडागळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पुणे जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांनी प्रसिद्धीस पाठविलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून दिली आहे.
महिला जिल्हा संघटक : शैलाताई खंडागळे (मावळ, पिंपरी-चिंचवड विधानसभा). महिला उपजिल्हा संघटक : वैशाली मराठे (मावळ, पिंपरी, चिंचवड विधानसभा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीनंतर महिला जिल्हा संघटिका शैलाताई खंडागळे म्हणाल्या, ” जिल्हा संघटकपदी नियुक्ती केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे मनापासून आभार मानते. पक्षाने दाखविलेला विश्वास आपण सार्थ ठरवून दाखवू. तसेच आगामी नगरपालिका, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महिलांचे संघटन मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत”, असेही खंडागळे म्हणाल्या.










Leave a Reply