Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 372 नवे रूग्ण

ही बातमी शेअर करा.

Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 372 नवे रूग्ण
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 370 तर हद्दीबाहेरील 2  असे 372 नवे रूग्ण सापडले आहेत. चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 330  जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात 1 लाख 5 हजार 281 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 73 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 841 तर हद्दीबाहेरील 772 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी 2 हजार 231 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले.

1 हजार 641 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 1 हजार 185 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 633 घरांना भेटी देऊन 1 हजार 924 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.


ही बातमी शेअर करा.